Please wait...

Terms & Conditions

🔆 वधू वर संशोधनामध्ये वधू वर दोन्ही पक्षाचे संपर्क कार्यालय म्हणून सकल मराठा सोयरीक फेडरेशन अंतर्गत, विविध वधु वर सुचक केंद्र /विवाह संस्था  / मराठा वधू वर व्हॉट्सऍप ग्रुप कार्यरत राहतील. 
 
🔆 सकल मराठा सोयरीक.com वैयक्तिक फि / देणगी ची सक्त करत नाही ,
परंतू , सोयरीक फेडरेशन अंतर्गत, विविध वधू-वर सूचक मंडळे/विवाह संस्था यांची फी व काम करण्याची पद्धत वेगवेगळी असल्याने त्यांच्याकडील फि,मानधन व देणगी बाबत सकल मराठा सोयरीक .com सहभागी अथवा सहमत असेलच असे नाही. संबंधित, केंद्र व विवाह संस्थेची चौकशी करुनच आपण आर्थिक व्यवहार करावा .  
 
🔆 नोंदणीचा कालावधी नोंदणी केल्यापासून एक वर्षाचा राहील त्यानंतर पुन्हा नुतनीकरण करणे आवश्यक आहे एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव वधु-वर सुचक केंद्र/विवाह संस्था यांच्यासह वधू-वरांना परत केली जाणार नाही.
 
🔆 आमच्या विवाह संस्थेची वार्षिक फी आपल्या स्थळाचा फोटो बाॅयोडाटा वर्षभर वेबसाईट वर ठेवण्यासाठी आहे. आज रोजी विवाह संस्थेकडे जी स्थळे उपलब्ध आहेत तीच पाहता येतील अन्यथा अपेक्षित स्थळ मिळेपर्यंत प्रतीक्षेची तयारी असावी.
 
🔆 आपल्या स्थळांची संपूर्ण सत्य माहिती देण्यात यावी असत्य माहिती देणे गुन्हा ठरू शकतो.
 
🔆 वेबसाईट वरील स्थळांचा गैरवापर झाल्यास नोंदणी रद्द होईल व कारवाईस पात्र ठरेल.
 
🔆 लग्नानंतर दुर्दैवाने उद्भवणाऱ्या वाईट परिस्थिती आपण विवाह संस्थेस / फेडरेशन ला जबाबदार धरू नये.
 
🔆 विवाह योग हा दोन्ही पक्षाचा प्रतिसाद,परस्पर सहकार्य व तडजोडीवर अवलंबून असल्याने त्याची हमी विवाह संस्था अथवा फेडरेशनला देता येणार नाही.
 
🔆 गुंतागुंतीच्या न्यायप्रविष्ट स्थळाबाबत नोंदणी न करण्याचे सर्वाधिकार विवाह संस्थेने अथवा फेडरेशनने राखून ठेवले आहेत.
 
🔆 अनुरूप स्थळांचे फक्त फोन नंबर संस्थेकडून दिले जातील( अनुरूप याचा अर्थ स्थळांची अपेक्षा, जात, उपजात, वय, शिक्षण, उंची,नोकरीचे ठिकाण,पत्रिका)  जुळवणारी अशी स्थळे मिळतील, सरसकट अनुरुप नसलेली अवास्तव स्थळांची माहिती विवाह संस्था/ फेडरेशन देऊ शकणार नाही.
 
🔆 विवाह संस्था / फेडरेशन कडून किंवा स्वप्रयत्नाने विवाह ठरल्यास कोणतेही शुल्क किंवा चार्जेस आकारले जात नाही.
 
🔆 जबाबदार व्यक्तीचा संपर्कासाठी एकच मोबाईल नंबर द्यावा शेतकी तो त्याच फोनवरून संपर्क साधा इतर नातेवाईकांनी संपर्क साधू नये.
 
🔆 वधु- वर व पालकांनी वेबसाईटवर भरलेल्या कोणत्याही माहितीशी विवाह संस्था अथवा फेडरेशन सहमत असणार नाही. स्थळांची अधिक माहिती स्वतः घ्यायची आहे खोटी माहिती / फसवणूक या  कोणत्याही तक्रारीसाठी विवाह संस्था / फेडरेशन  जबाबदार नाही.
 
🔆 वेबसाईट वर फॉर्म भरणाऱ्या स्थळांनी आधार कार्ड,पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी ओळखीचा पुरावा नोंदणी करतांनी पाठवावा.
 
🔆 आपल्या योग्यतेची स्थळे वेबसाईटवर पहावी पालकांनी स्थळांसाठी सतत विचारणा करू नये.
 
🔆 विवाह संस्थेचे साप्ताहिक सुट्टी नाही पण काही कारणास्तव, विवाह संस्था,कार्यालय सुट्टी घेऊ शकते त्यामुळे आपले सहकार्य अपेक्षित आहे.
 
🔆 वेबसाईट वर महाराष्ट्रातील मराठा व मराठा समाजातील अनेक शिक्षित उच्चशिक्षित ती स्थळे नोंदवली असल्यामुळे येथे नाव नोंदविल्यानंतर इतर कोणत्याही एजंट, दलाल कडे नाव नोंदवण्याची आवश्यकता नाही
 
🔆 वेबसाईटवर नाव नोंदणी करणाऱ्या ने आपल्या स्थळाबद्दल ची माहिती खरी- खरी नोंदणी फॉर्ममध्ये घ्यावी व ही नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. यात काही असत्य निघाल्या त्याची सर्वस्वी जबाबदारी नोंदणी करणार्‍यावर असेल याची कृपया नोंद घ्यावी.
 
🔆 वधू- वरांना संपर्क करण्यापूर्वी आपली आर्थिक स्थिती,पगार,पद,रूप व समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा लक्षात घेणे गरजेचे आहे.
 
🔆 विवाह संस्था किंवा फेडरेशनच्या मार्फत इव्हेंट मॅनेजमेंट मंगल कार्यालय केटरिंग व शुभकार्यासाठी लागणाऱ्या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत करते.
 
🔆 सकल मराठा सोयरीक. Com  वेबसाईट वर नाव नोंदवण्यासाठी आपण आपली देणगी स्वखुशीने या मोबाईल 📱9130950999  नंबर वर गुगल पे/ फोन पे ने जमा करु शकतात.
 
🔆 पत्रिका जुळत नाही तसेच देवक, गोत्र, नाडी व रक्तगट एक आल्यावर चांगले स्थळ ना करणे या गोष्टींना विज्ञानाची मान्यता नाही. त्यामुळे या गोष्टींवर विश्वास ठेऊन स्थळ नाकारणे योग्य नाही पत्रिकेतील गुणापेक्षा मुला-मुलींचे प्रत्यक्षातील अंगचे गुण बघावेत.
 
🔆सकल मराठा सोयरीक .com  माध्यमातून आम्ही नव्यानेच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहोत.त्यामुळे,यामध्ये काही त्रुटी असतील तर आमच्या निदर्शनास आणून दिल्यास आम्ही त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू..
 
आमच्या वेबसाईटवर देण्यात येणाऱ्या सुचना,नियम व अटी मान्य असतील तरच आमच्या केंद्रात नोंदणी करावी.
 
🔆मराठ्यांसाठी मराठ्यांसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न...!!