Please wait...

About Us

*एक कल्पक चळवळ समाज प्रबोधनाची...*

*समाजाच्या मनापर्यंत पोहचण्याचा संकल्प...*

*"सकल मराठा सोयरीक डॉट कॉम"चे एक वर्तुळ....!!*

इतिहासाच्या असंख्य पानात देशाचा पोशिंदा आणि रखवालदार म्हणुन लौकिक असलेल्या सकल मराठा समाजात सध्या अनेक स्थित्यंतरे होऊन परिवर्तन घडत आहे. सामाजिक हक्कांसाठी लढा उभारला जात असतांना राजकिय विचारपिठावर पिछेहाट अनुभवावी लागत आहे. इतर समाजाशी असलेला समन्वय सुद्धा चुकीच्या व एकांगी संवादाने खंडीत होत आहे. बाह्य समस्यांचे अनेक प्रकारात आव्हान असतांना समाजांतर्गतही काही विषय नियंत्रणाबाहेर होत आहेत त्यातलाच एक गंभीर विषय म्हणजे उपवर वर वधुंच्या विवाह जुळणीचा..... याच विषयावर विधायक व समाजहिताचा दृष्टीकोन स्विकारुन " सकल मराठा सोयरीक" या संस्थेचे काम आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सुरु केले..

सकल मराठा समाजातील सर्व घटकांतील उपवर मुला-मुलींची माहिती गोळा करण्याचा वसा या संस्थेच्या माध्यमातून ९ वर्षापूर्वी सुरू केला. हे सर्व काम ना नफा ... ना तोटा किंबहुना जिथे सौजन्य मिळेल तिथे मोफत केले जात आहे.

"सकल मराठा सोयरीक" व्हॅन गावोगावी पोहचवून उपवर मुला-मुलींचे फोटो व माहिती  भविष्यात गोळा केली जाणार असून आतापर्यंत जवळपास २००००

वर उपवर मुला मुलींची माहिती संकेतस्थळावर गोळा झाली असुन संकेतस्थळाच्या माध्यमातून आज आपल्या हाती देतांना आम्हास आनंद होत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो याच भूमिकेतून मी आणि माझे सर्व सहकारी मिळून आम्ही " सकल मराठा सोयरीक'' चा शासनमान्य प्रकल्प सुरु केला.

समाजाचे सर्व प्रश्न राजकारण किंवा प्रशासनाच्या पातळीवर सुटत नाहीत. काही प्रश्न हे समाजातील मंडळींनीच पुढाकार घेऊन सोडवायचे असतात.

या विचारातुन प्रेरणा घेऊन *'सकल मराठा सोयरीक*' चे काम सुरु झाले आणि ते सतत वाढत गेले.

या पुढील काळात " सकल मराठा सोयरीक" पश्चिम महाराष्ट्रासह धुळे, नंदुरबार आणि नाशिक इत्यादी अनेक जिल्ह्यातही वाढवायचे आहे. यासाठी संगणकिय यंत्रणेने परिपूर्ण मोबाईल व्हॅनचा वापर केला जाणार आहे. हे काम आमच्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. पहिल्या टप्प्यातील  संकेतस्थळाच्या माध्यमातून आता समाज बांधवांच्या हातात आम्ही देत आहोत...हे काम एकदा करून थांबवावे लागणार नाही. .ज्यांची विवाह जुळणी होईल त्यांनी तशी ती माहिती त्वरीत कळवायची आहे. शिवाय, दरवर्षी विवाहयोग्य वयोगटात येणाऱ्या मुला-मुलींची माहिती देखिल अपडेट करणे आवश्यक आहे.या कामासाठी सर्वच समाजबांधवांचे सक्रिय सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.

राजकारणी + समाजसेवक अथवा शैक्षणिक, शासकीय, व्यावसायिक इ. कोणत्याही अधिकार पदावर असलेल्या तमाम समाजबांधवांकडून पुढीलप्रमाणे सहकार्य अपेक्षित आहे....

---------------------------------

*ही नवीन संकल्पना नेमकी काय व कशासाठी ?*

हे आपल्या सकल मराठा समाज बांधवांना आपण समजावून सांगाल अशी आग्रहाची विनंती आहे. *"समाजाचं आपण देणं लागतो"* हा आमचा कृतीशील संकल्प आहे.... त्यासाठी हा सारा प्रयत्न आपल्याकडे मागच्या पिढीपर्यंत सुदृढ समाजव्यवस्था होती, ज्यात विवाहकार्य जुळविण्यासाठी अनेक समाजसेवी, प्रतिष्ठित व ज्येष्ठ व्यक्ती आपले सामाजिक कर्तव्य समजून विवाह जुळविण्यात सक्रिय व अग्रेसर रहात होते. मात्र कालपरत्वे व्यक्तीगत गरजा, कामाचे स्वरूप यामुळे स्वतःच्या कुटुंबियालाच पुरेसा वेळ देता येत नाही त्यामुळे इच्छा असूनही

या परंपरागत *'सुन/ जावईशोध'* कामात नेहमी सहभागी होता येत नाही. वेळ देता येत नाही यास्तव ही निकड लक्षात घेवून सर्वांच्या *किमान* सहकार्याने परंतु सर्वांच्या *कमाल* सुखासाठी आम्ही ही नवीन संकल्पना घेवून आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून येत आहोत. 

----------------------------------

*सकल मराठा समाजातील नाव नोंदणीबद्दलचे गैरसमज व वस्तुस्थिती !*

 à¥§) ज्यांचे कुणी पाहणारे नाहीत

अशा शहरी लोकांसाठी हे फॅड आहे. अल्प शिक्षित, शेतकरी इ. ना याचा काय फायदा ? 

२) आमची मुलगी / मुलगा सुंदर सुशिक्षित, सुस्थितीतील आहे. त्यामुळे आम्हाला गरज नाही.

३) अनोळखी ठिकाणी लग्न जमविण्यापेक्षा नात्यातच पाहू या. इ. इ.

४) ज्यांची लग्ने जमत नाहीत व चांगले स्थळ मिळत नाही तेच अशा परिचय मेळाव्यात व फाइलींमध्ये नोंदणी करतात अशा प्रतिगामी जुनाट विचार काही पालक करतात. वास्तविक संगणक, मोबाईल, इंटरनेटमुळे अख्खे जग आपल्या मुठीत सामावलेले आहे. त्या बदलाचा आपल्या समाज बांधवांनी स्विकार करायलाच हवा. खात्री न करता मत बनवणे चूक होय.

------------------------------

*आताची वस्तुस्थिती काय आहे ते पाहू या !!*

१) हल्ली प्रत्येकाजवळ वेळ नसणे, वाढती महागाई आणि त्यामुळे स्वकेंद्रित विचारसरणी बळावत चाललेली आहे. त्यामुळे स्थळ शोधायला साहजिकच मर्यादा येतात. याशिवाय सतत स्थळ दाखविणे / पहायला जाणे त्यासाठी प्रवासखर्च+ चहापाणी + नाश्ता + जेवण + भेटी इ. चा अनावश्यक खर्च टाळता येवू शकतो..

२) वेबसाइट +फोटो अल्बम फाइलमधील नोंदणी + परिचय मेळाव्यामुळे भरपूर स्थळांमधून आपणास अनुरूप असे अनेक चांगली स्थळे शोधता येतात. आणि चौकस राहून योग्य निर्णय घेता येतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वरीलप्रमाणे सतत होणारा प्रवास व अन्य खर्च, वेळ आणि श्रमाची बचत होते. 

३) उलट नवीन संबंधामुळे नवीन नाती व नवीन गावे जोडली जातात. हा सर्वांत मोठा फायदा आहे.

४) स्थळ पाहण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी जरी असले तरी त्याला सुद्धा बऱ्याच मर्यादा आहेत. उलटपक्षी या नाव नोंदणीत भरपूर पर्याय असल्याचा फायदा घेता येतो आणि म्हणजे निर्णय आपण व आपल्या कुटुंबियांचा असल्याने नशिबाला किंवा देवाला दोष देण्याची गरज भासत नाही. इतका सुंदर पर्याय आहे हा !!

५) अनोळखी ठिकाणी लग्न कसे जमवायचे याचे सरळ सोपे उत्तर आहे की,आपला मराठा समाज सर्वत्र पसरलेला आहे. कोठे ना कोठे नातेसंबंध निघतात अनेक राजकारणी व समाजधुरीणांनी 'व्यापक दृष्टीकोन' ठेवून आपल्या मुलामुलींचे एकमेव हित समोर ठेवून जाती-पोटजाती आणि गावापलिकडे नविन नाती जोडून समाजापुढे आदर्श ठेवलेला आहे. विशेष म्हणजे कोणीही आपल्या काळजाच्या तुकडयाची जीवापाड काळजी घेतोच.त्यामुळे थोडी काळजी आणि चांगली चौकशी केल्यास अनुरूप जोडीदार सहजगत्या मिळतो. 

--------------------------------------

*पालकांनी काय करावे व काय करू नये ?*

१) जन्मतारीख, वय, शिक्षण, नोकरी (खरी खोटी) यासाठी बिनधास्तपणे अधिकृत कागदपत्रे पहावीत, त्यासाठी ठामपणे मागणी करावी. त्यामुळे फसवणूकीचा प्रश्न उद्भवत नाही. 

२) आणि अशा प्रकारच्या चौकशीचा ज्यांना राग येत असेल तर नक्कीच त्या स्थळाला नकार देता येतो. कारण आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न निगडीत असतो. 

३) कोणत्याही परिस्थितीस मुलींचे मोबाईल नं. बायोडाटामध्ये देऊ नये.

४) स्थळाची व कुटुंबियांची वर्तणूक, सामाजिक सांपत्तिक स्थितीची निर्भीडपणे खात्री करा. 

(५) केवळ होकार आला तर हुरळून जाणे आणि नकार आला तर नाराज होणे हे टाळण्यासाठी स्वतः पालक आणि मुलामुलींनी प्रत्यक्ष जावून चौकशी करणे ही काळाची गरज आहे. व तेच आपल्या वर-वधूच्या हिताचे आहे.

*स्पष्टवक्ता सुखी भव ! ही वृत्ती ठेवावी म्हणजे नंतर पश्चाताप करावा लागत नाही !!..*

धन्यवाद...

*जय जिजाऊ...   à¤œà¤¯ शिवराय...*

*आपले स्नेहांकित*

*सकल मराठा सोयरीक ग्रुप महाराष्ट्र राज्य*